higher-education

अभ्यास मंडळ स्थापन होणार लवकरच

Webdesk | Tuesday, January 2, 2018 12:16 PM IST

नागपूर : राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाच्या ७३ अभ्यास मंडळांवर सदस्य नेमणुका लवकरच होणार आहेत. त्यामुळे आगामी शैक्षणिक सत्राच्या आधी अभ्यास मंडळे कार्यरत होणार आहेत. दरम्यान, केवळ ५३ अभ्यास मंडळांवरच अध्यक्ष निवडून येणार असल्याने तितकेच सदस्य विद्वत परिषदेत जाणार आहेत.

नागपूर विद्यापीठाच्या ७३ अभ्यास मंडळांपैकी केवळ ३१ अभ्यास मंडळांवर प्रत्येकी तीन जागांकरिता निवडणूक घेण्यात आली होती. तर तब्बल ४२ अभ्यास मंडळांवर निवडणूक झाली नाही. त्यापैकी २१ अभ्यास मंडळात एक ते दोनच उमेदवार असल्याने त्यांची अविरोध निवड झालेली आहे. त्यामुळे कुलगुरू डॉ. सिद्धार्थविनायक काणे यांना आता ४२ अभ्यास मंडळांवर सात सदस्य नामनिर्देशित करावे लागणार आहेत. तर एक व दोनच सदस्य असलेल्या २१ अभ्यास मंडळांवर सातपेक्षा अधिक सदस्य नामनिर्देशित करावे लागणार आहे.

यासंदर्भात डॉ. काणे यांच्याशी बातचित केली असता ते म्हणाले, ७३ पैकी ५३ अभ्यास मंडळांवर पूर्ण सदस्य नामनिर्देशित होणार आहेत. त्यामुळे तिथे दहा सदस्य मिळून एकाला अध्यक्ष निवडून देतील. अभ्यास मंडळाचा अध्यक्ष हा विद्वत परिषदेचा पदसिद्ध सदस्य आहे. त्यामुळे ७३ पैकी केवळ ५३ मंडळांच्या अध्यक्षांनाच विद्वत परिषदेत स्थान मिळणार आहे. उर्वरित २० मंडळांवर तीन ते सहाच सदस्य राहण्याची शक्यता