higher-education

जेईई अॅडव्हान्स परीक्षा सुरळीत

Webdesk | Monday, May 21, 2018 11:50 AM IST

मुंबईसह देशभरातील आयआयटी आणि तत्सम संस्थेच्या प्रवेशासाठी द्यावी लागणारी 'जेईई अॅडव्हान्स' ही परीक्षा रविवारी देशभरात सुरळीत पार पडली. देशभरातील १ लाख ६० हजार ७१८ विद्यार्थी या परीक्षेसाठी पात्र ठरले होते. 'जेईई मेन'प्रमाणे या परीक्षेसाठीही विद्यार्थ्यांना युनिफार्म आणि इलेक्‍टॉनिक्‍स वस्तू घेऊन जाण्यास मज्जाव करण्यात आला होता. यंदाचा पेपर गेल्यावर्षीच्या तुलनेत अवघड गेल्याचेही विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. 

देशभरातील सर्व केंद्रांवर सुमारे १० हजार ९९८ जागांसाठी ऑनलाइन पध्दतीने ही परीक्षा घेण्यात आली. या परीक्षेचा निकाल १० जून रोजी जाहीर करण्यात येणार आहे. दरम्यान, पेपर २ अवघड असल्याचे विद्यार्थ्यांकडून सांगण्यात आले. पेपर १ मात्र तुलनेत सोपा गेल्याचे त्यांचे म्हणणे होते.