higher-education

१२ वी प्रात्यक्षिक परीक्षा, बहिष्काराचे सावट कायम

Webdesk | Saturday, January 27, 2018 8:25 PM IST

औरंगाबाद : माध्यमिक व उच्चमाध्यमिक शिक्षण मंडळातर्फे घेण्यात येणाऱ्या बारावीच्या परीक्षा २१ फेब्रुवारीपासून आणि प्रात्यक्षिक परीक्षा पाच फेब्रुवारीपासून सुरू होत आहेत. परीक्षेचे हॉलतिकीट ३० जानेवारीपासून वितरित करण्यात येणार आहेत. परीक्षांवर शिक्षकांच्या बहिष्काराचे सावट कायम आहे. 

दहावी, बारावी परीक्षांचे वेळापत्रक मंडळाने जाहीर केले. मंडळाच्या परीक्षांवर ज्युनिअर कॉलेजच्या शिक्षकांनी बहिष्कार टाकण्याची भाषा सुरू केली. दोन फेब्रुवारी रोजी ज्युनिअर कॉलेज बंद पाळणार आहेत, तर प्रात्यक्षिक परीक्षा न घेण्याचे शिक्षकांकडून सांगण्यात येत आहे. त्यावर मंडळ अधिकाऱ्यांनी सावध पाऊले उचलित प्रात्यक्षिक परीक्षा सुरळीत होतील, असे सांगितले. परीक्षार्थींना मंडळाकडून ३० जानेवारीपासून विद्यार्थ्यांना हॉलतिकिटांचे वाटप करण्यात येणार आहेत. औरंगाबाद विभागातील पाच जिल्ह्यातून एक लाख ६५ विद्यार्थ्यांनी बारावी परीक्षेसाठीची नोंदणी केली आहे.