university

एलएलएम सत्र-१ परीक्षा २२ पासून

Webdesk | Friday, January 12, 2018 8:34 PM IST

  एलएलएम सत्र-१ परीक्षा २२ पासून

मुंबई : मुंबई विद्यापीठाच्या एलएलएम सत्र-१ ची परीक्षा येत्या २२ जानेवारीपासून घेण्यात येणार आहे. गुरुवारी विद्यापीठातर्फे परीक्षेची तारीख जाहीर झाली असून यासंबंधीचे सुधारित वेळापत्रक लवकरच प्रसिद्ध केले जाणार आहे. ही परीक्षा १७ जानेवारीपासून सुरू होणार होती.

एलएलएमच्या विद्यार्थ्यांनी एलएलएम (सत्र-१) ची परीक्षा पुढे ढकलण्यासाठी विद्यापीठाकडे निवेदन दिले होते. या अनुषंगाने परीक्षा विभागाने संबंधित अधिष्ठाता आणि प्राचार्य यांचे मत विचारात घेऊन विद्यार्थ्यांचे कोणतेही शैक्षणिक नुकसान होऊ नये, यासाठी परीक्षा पुढे ढकलण्याचा निर्णय घेतला.