university

शिक्षणशुल्कामुळे करलाभ

Webdesk | Saturday, January 6, 2018 8:41 PM IST

शिक्षणशुल्कामुळे करलाभ

मुंबई : मुले शाळेत शिकत असतील तर त्यांचे शिक्षणशुल्क किंवा फी ही करवजावटीचे चांगले साधन बनू शकते. प्राप्तिकर कायदा, १९६१ कलम ८० सी अंतर्गत शिक्षण शुल्कासाठी करलाभ मिळतो. ही करसवलत या कलमांतर्गत असलेल्या वार्षिक १.५ लाख रुपये करमुक्त रकमेअंतर्गत असते.

>> चालू आर्थिक वर्षात नोंदणीकृत, अधिकृत विद्यापीठ, महाविद्यालय, शाळा किंवा अन्य शैक्षणिक संस्था येथे प्रवेश घेतेवेळी भरलेले शिक्षणशुल्क किंवा फी ही करलाभासाठी पात्र असते.

>> शिक्षणशुल्कापासून करलाभ घेताना ते शिक्षण पूर्णवेळ असणे गरजेचे आहे. यामध्ये प्लेस्कूलमधील शिक्षण, पूर्वप्राथमिक शाळा (प्रि-नर्सरी व नर्सरी वर्ग) यांचाही समावेश होतो. अशी संस्था खासगी असून शकते किंवा सरकारने प्रायोजित केलेली असू शकते.

>> कधी कधी पालकांना शिक्षणशुल्काव्यतिरिक्त काही रक्कम पाल्याच्या शिक्षणासाठी संबंधित संस्थेला द्यावी लागते. यामध्ये विकासनिधी, देणगी (डोनेशन), कॅपिटेशन फी आदींचा समावेश होतो, ज्यावर करलाभ मिळत नाही. त्याचप्रमाणे क्रमिक शिक्षणशुल्क विलंबाने भरल्यास लागू होणारे विलंबशुल्क करलाभास पात्र होत नाही.