higher-education

विना अनुदानित शाळांची आर्थिक कोंडी

Webdesk | Monday, January 29, 2018 10:17 PM IST

नाशिक : नाशिक जिल्ह्यातील प्राथमिक शाळांना गेल्या सहापैकी तीन वर्षांची शिक्षण फी प्रतिपूर्ती रक्कम अद्यापही मिळालेली नाही. परिणामी विनाअनुदानित शाळांची आर्थिक कोंडीझाली आहे. शिक्षण फी प्रतिपूर्तीबाबत शिक्षण विभागाकडून चालढकल केली जात असल्याचा आरोप या शाळांनी केला आहे. 

राज्यात २००९ लागू झालेल्या बालकांचा सक्तीचा व मोफत शिक्षणाच्या अधिनियमातील तरतुदीनुसार २५ टक्के दुर्बल व वंचित घटकातील बालकांना विना अनुदानित शाळांत प्रवेश दिला जातो. या तरतुदीनुसार शाळाप्रवेश झालेल्या बालकांचे शिक्षण शुल्क शासनाकडून सबंधित शाळांना प्रतिपूर्ती करण्याचीही तरतूद आहे.