higher-education

IIT-JEE चा निकाल जाहीर; सुरज कृष्णा प्रथम

Webdesk | Monday, April 30, 2018 9:41 PM IST

IIT-JEE चा निकाल जाहीर; सुरज कृष्णा प्रथम

केंद्रीय माध्यमिक शिक्षण मंडळाने (सीबीएसई) आज संयुक्त प्रवेश परीक्षा-मुख्य (जेईई-मेन) या परीक्षेचा निकाल घोषित केला असून या परीक्षेत आंध्र प्रदेशातील विजयवाडा येथील सुरज कृष्णा देशात पहिला आहे आहे. या वर्षी सुमारे १४ लाख विद्यार्थ्यांनी जेईई-मुख्य परीक्षा दिली होती. 

गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा कट ऑफचा आकडा घसरल्याचे दिसत आहे. गेल्या वर्षी खुल्या गटाचा निकाल ८१ टक्के इतका लागला होता. यंदा मात्र हा आकडा ७४ वर घसरला आहे. 

ज्या उमेदवारांनी ऑनलाइन, तसेच ऑफलाइन परीक्षा दिली होती, असे उमेदवार आपला निकाल अधिकृत वेबसाइट- jeemain.nic.in वर पाहू शकणार आहेत. देशभरात दरवर्षी एनआयटी, आयआयटी आणि इतर सीएफटीआयमध्ये इंजिनीअरिंग आणि आर्किटेक्चर अभ्यासक्रमांसाठी जेईई-मुख्य परीक्षा घेतली जाते. जेईई अॅ़डव्हान्ससाठी देखील प्रवेश परीक्षा घेण्यात येते.